Marathi Christi Bhajan Marathi christmas song marathi jesus worship song

Khrist Janmala Aaj | ख्रिस्त जन्मला आज | Marathi Christmas Songs | Marathi Songs | Song Lyrics and Music Video

Praise The Lord. Marathi Christmas Songs, Marathi Songs, Song Lyrics.


Marathi Christmas Songs | Marathi Songs | Song Lyrics and Music Video
Marathi Christmas Songs
1)
पाहा हो दुत कसे गाती
परमोच्यावर गौरव शांती या धरणी वरती ।।धृ।। 

नरावर कृपा हो, वदती
जय, जयकारे व्योमी सारे, गृह हे दणदणती ||१|| 

प्रिती नावरुप धरती
दिन नरास्तव दिन होऊन, ह्या भुवनी येती ।।२।। 

हिऱ्यासम रवि जिच्यावरती
तिच अंगुली मुखी घालुनी, लघु गोष्टी रमती ।।३।। 

खिस्ता तव अंगुली फिरती
तसे फिरावे, हीच निरंतर, दे आम्हा वृती ॥४॥

2)
बेथेलहेमात गाईच्या गोठ्यात
उध्दारक ख्रिस्त जन्मला
जोजाविते मरियम माता त्याला हो माता त्याला……. ।।धृ।।

ताऱ्यांनी गर्दी केली आकाशात रात्रीची वेळ होती चहीकडे शांत 

गाई वसरे हांबरती सांगती जगाला, उध्दारक ख्रिस्त जन्मला 
जोजाविते मरियम माता त्याला, हो माता त्याला……. ।।१।।

नाही मिळाला पुरेसा बिछाना, सुंदर तर राहु द्या पण तुटकाही पाळणा 

गाई वसरे हांबरती सांगती जगाला, उध्दारक ख्रिस्त जन्मला
जोजाविते मरियम माता त्याला हो माता त्याला…… ।।२।।

3)
बेथेलहेम शहरी दावीद नगरी, जन्माला आला येशु बाळ 

चला एकीने साजरा करु या नाताळ (२)…।।धृ।। 

अति पवित्र मंजुळ वाणी, पडताच साऱ्या ज्या कानि 
पुर्वे दिशेला तेजस्वी तारा, तो मार्गाचा देई इशारा
तारणारा पाहु, ध्यानाचा गाऊ, लुटुया हर्षाचा काळ… ।।१।। 

गोठा गाईचा शोभुन दिसतो, तारा पाहुनी येशु बाळ हसतो 
मागी निघाले त्या दर्शनाला, सोने, उद, गंधरस अर्पण्याला 
मरियम माता बाळाचा त्राता, करी जिवाचा संभाळ… ।।२।। 

चला एकीने सारे जाऊ, प्रेमाने हाती हात घेऊ 
हा प्रेमाचा संदेश ध्या हो, तुम्हा नाताळ सुखाचा जावो 
प्रथम गाते, नाताळ गिते, वाजवुनी मृदंग टाळ…।।३।।

4)
गौरव असे स्वर्गात ही, शांती असे पृथ्वी वरी 

अवतरली प्रिती युगांतरी… … । । धृ ।। 

पूर्व दिशेला तारा, नभात लक-लकला 
उध्दारक जन्माला पाहतो, सांगे जगताला 
तारण, आले, मनुजा, भेटायला… हो….. । । १ ।। 

उंटावरुनी मागी. दर्शनास आले. 
आनंदाने धन्य जाहाले. पाहूनी सोनुले 
हस्ते, रडते, बाळ गजिरवाने….. हो…… ।।२।। 

ख्रिस्त जयंती म्हणजे, शांतीचा संदेश 
सांगु सुवार्ता लोकी, तो प्रांत असावा देश 
नाती, जाती, प्रेमातुन रूजली…. हो……।।३।।


5)
आज येशु बाळ जन्माला आला
बेथेलहेम गावी बाळ जन्माला आला ||१||

गाईच्या गोठ्यात येशु बाळ जन्मला
धनगर लोक धावत धावत आले ।।२।।

पुर्व दिशेला चमला तारा
तारा पाहूनी मागी लोक आले ।।३।।

मागी लोकांनी सोने अर्पन केले
बेथेलहेम गावी आनंद झाला ।।४।।

6)
मोठा हर्ष झाला आज जन्म दिनाचा
नमन करु आज येशु बाळाला
हसुन गाऊ आज येशु बाळाला….. ।।धृ।।

हर्ष झाला सारी सृष्टी, लाखो देवदुत आज गित गाती 

मिळुनी गाऊ आज जय जयकार करु ||१|| 

विजय राजा जन्मी आला, पूर्व दिशेला चमके तो तारा 
लहान थोर आज गाऊ या गाणे…… ।।२।।

मन हे माझे येशु राजाचे हिच एक प्रार्थना ऐकुनीया हो 

माझे हे मन आज हर्ष झाले……।।३।।

7)

आला आला हो चला नाताळ आला, 

गाऊ चला नाचु चला येशु बाळाला ||१||

गाईच्या गोठी पाहा येशु बाळाला
नमन भजन पुजन करु येशु बाळाला ।।२।।

पुर्व दिशेला तारा हा दिसला
तारा पाहुनी मागी लोक आले
चला जाऊ आनंद करु येशु बाळाला ||३||

सोने, उद, गंध देऊ येशु बाळाला
आपण काय देऊ येशु बाळाला ।।४।।

मनात जागा देऊ येशु बाळाला
मन हे माझे देऊ येशु बाळाला 11411

8)
नाताळाच्या ह्या सुदिनी, 

बाळ जन्मले गाय गव्हाणी ।।धृ।। 

गगनामधुनी निनाद उठला, पूर्व दिशेला तारा दिसला 
मागी लोकांनी तो पाहीला, पाहुनी निघती प्रभु दर्शनाला 
उद,गंधरस गेले अर्पुणी ।।१।।

मेंढपाळही आले पाहायला, आणली कोकरे तया अर्पण्या 
प्रिय बाळाशी नमन कराया, प्रभु नामाचा गजर व्हावाया 
गेले पाहा त्याला गौरवुनी ||२||

देवदुत पाहा महिमा गाती, हर्षित होऊनी गित गुणगाणती
येशु पुढे लोटांगण घेती, प्रिय बाळाशी धन्य वधती 

धन्य धन्य देवाची करणी ।।३।।


9)

आकाशी तारा चमकला, फुलांनी रंग उधळला 

जिवनाला अर्थ मिळाला, येशुचा जन्म झाला | | धृ || 

गाय गव्हाणी मेंढरे रानी, हर्षित झाली प्रभु आगमनी 
प्रभु माझा नम्र हो झाला, जगाला तारावयाला 
येशुचा जन्म झाला…. 11911

भिऊ नका संदेशा हा, आम्हासाठी त्याने दिला 

प्रितीचा राजा हो आला, नमन करुया त्याला
येशुचा जन्म झाला…..।।२।।

मंगल खुदाई आनंदाने, घेऊया दर्शन आपण त्याचे 

होईल स्पर्श प्रितीचा, आपल्या जिवनी फुलला 
येशुचा जन्म झाला…..।।३।।

10)

प्रभु ख्रिस्त जगी जन्मला, बेथेलहेमे तो अवतरला 

त्यागुनी स्वर्गाला, गव्हाणीत आला,
जन्मला, जन्मला, जन्मला ।।धृ।।

फुल यहुदयामधुनी, आज बाळ जन्मला गव्हाणी 

जाऊनी वार्ता सांगा जगाला (२) गाऊनी गोड गिताला 
त्यागुनी स्वर्गाला, गव्हाणीत आला, जन्मला…(२) ।।१।। 

आली वाणी देवदुतांची गाणी गाईली गोडस्वरांनी (२) 
पापी जनांच्या उध्दारास्तव (२) प्रभु येशु अवतरला 
त्यागुनी स्वर्गाला, गव्हाणीत आला, जन्मला…(२) ।।२।।

11)


गार गार.. (२) हवा आली नाताळाची रस आली……।।धृ।।

नाताळ आला आणि चमकला तारा, बेथलेहेम गावात….. 

बेथलेहेम गावाला चमकला तारा, गाईच्या गव्हाण्यात….(२) ।।१।। 

आधि मेंढपाळ गेले त्या, चिमुकल्या येशुला….
मेंढपाळ बघुनी येशु बाळाला, आनंदाने नाचले ।।२।।

जगाचा तारक जन्मी आला, गाईच्या गव्हाण्यात… 

गाईच्या गव्हाणीत दुतांनी केला आनंदाने उत्सव ।।३।।

12)

ख्रिस्त जन्मला आज ख्रिस्त जन्मला
फेर धरु गाऊ नाचु या ग चला
ख्रिस्त जन्मला, ख्रिस्त जन्मला ।।धृ।। 


मेंढपाळ होते कोणी, मेंढरे राखीत होते रानी 
तेज क्षणार्धी फाकले, नभो मंडळा ||१|| 

दाविदाच्या नगरात, बेथेलहेम शहरात 
तुम्हा तारायला पाहा बाळ जन्मला ।। २।। 

आणि तुम्हां हीच खुण, बाळंत्यानी गुंडाळुन 
गव्हाणीत प्रभु बाळ, निजवियला ||३||

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

marathi jesus worship song

Mi Venchile Phulana, मी वेचिले फुलांना, marathi christian song

Mi Venchile Phulana, मी वेचिले फुलांना, marathi christian song Mi Venchile Phulana Praise The Lord. मी वेचिले फुलांना’ यह एक
marathi jesus worship song

Ishwarachi Daya, ईश्वराची दया, Marathi Jesus worship Song Lyrics

Ishwarachi Daya, ईश्वराची दया, Marathi Jesus worship Song Lyrics Ishwarachi Daya Praise The lord. ‘ईश्वराची दया’ यह एक Marathi Jesus